नाशिक : प्रतिनिधी
येथील अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका स्मिता बोराडे यांना राष्ट्रीय तरुण संशोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
अक्कलकुवा येथील विद्या विकास संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन प्रबोधिनी, मुंबई व पी. जी. आर. आय. लमपांग विद्यालय (इंडोनेशिया) यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथे २० व २१ ऑक्टोबर दरम्यान आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रा. बोराडे यांना हा पुरस्कार देण्यात आला.
प्रा. स्मिता बोराडे यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या विषयात संशोधन केलेल्या कामगिरीबद्दल व संशोधनाची तळमळ जाणून घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार डॉ. मेदा गावित (सिनेट सदस्य केबीसीएनएमयु, जळगाव) यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. कार्यक्रमासाठी कॉमर्स ॲण्ड मॅनेजमेंटचे डीन डॉ. अनिल डोंगरे, आर्ट्स ॲण्ड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, परिषदेचे संयोजक डॉ. जय बागुल, अफगाणिस्तानच्या नागहर विद्यापीठातील प्रा.अहमद गुल व लखनौ विश्वविद्यालयाचे प्रा. डॉ. आर. बी. सिंह आदी उपस्थित होते.
—