म्हसरूळ : प्रतिनिधी
येथील सार्वजनिक वाचनालय व राठोड ऑप्टिकल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन सार्वजनिक वाचनालयाच्या मुक्तद्वार विभागात करण्यात आले होते. यावेळी ऋषिकेश राठोड यांनी रुग्णांची मशीनद्वारे तपासणी करून, त्यांना डोळ्यांची निगा राखण्याबद्दल सल्ला दिला.
या कार्यक्रमासाठी वाचनालयाचे प्रमुख कार्यवाहक विनायक सूर्यवंशी, खजिनदार विठ्ठलराव धनाईत, देवकिसन व्यास, पद्माकर मोराडे, प्रकाश उखाडे, रविकिरण पगारे, विश्वास मोराडे, अनिल मोराडे, केशवराव गायकवाड, शशिकला गायकवाड, शर्मा, निकम, वैशाली केकरे, कल्पना सूर्यवंशी, पगारे, कृष्णा सूर्यवंशी, तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. विनायक सूर्यवंशी यांनी राठोड यांचा वाचनालयाच्यावतीने सत्कार केला.
—