नाशिक : प्रतिनिधी
धम्मगिरी सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था संचलित सोपान योग महाविद्यालय व जीवक डेंटल क्लिनिक यांच्या सौजन्याने राजीवनगर वसाहतीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवसेना (ठाकरे गट) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी न्यायाधीश अनिल वैद्य, पी. आर. पी. गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष शशिकांत उन्हवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य एन. के. देवरे, योगाचार्य अशोक पाटील, प्रा. राज सिन्नरकर, संस्थेचे संचालक राजेंद्र काळे, संस्था सचिव डॉ. पल्लवी जाधव, संस्थेचे मार्गदर्शक डॉ. विशाल जाधव, अध्यक्ष कैलास जाधव, ॲड. शरद जाधव, किरण लोखंडे, रावसाहेब मकासरे, गणेश तुपसुंदर, सिद्धार्थ धबाले, गौतम अंभोरे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
—
नाशिकमधील राजीवनगर वसाहतीत स्वातंत्र्यदिन उत्साहात
Get real time updates directly on you device, subscribe now.