नाशिक : प्रतिनिधी
नाशिक फर्स्ट ट्राफिक एज्युकेशन पार्क, मोटकरी नगर येथे महिलांसाठी रस्ता सुरक्षा व वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृती करण्यात आली. यातंर्गत हेल्मेट, सीटबेल्ट आणि वाहतूक नियम आदी रस्ता सुरक्षेबाबत जागृती करण्यात आली. सुरक्षेसंदर्भात पोस्टर्स लावण्यात आले. हे प्रशिक्षण मेरी – म्हसरूळ परिसरातील महिलांसाठी गणेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलने आयोजित केले होते. या शिबिरासाठी माजी महापौर रंजना भानसी, वाहन निरीक्षक नमिता सानप, प्रांजली देवरे यांनी मार्गदर्शन केले. परिसरातील बहुसंख्य महिला व मुलींनी प्रशिक्षणाचे धडे घेतले. जागृती फाउंडेशनच्या संस्थापिका ललिता नवगिरे, नाशिक ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र सोनवणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन गणेश ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका मेधा वाघ यांनी केले.
—
नाशिकमध्ये रस्ता सुरक्षा नियमांबाबत महिलांमध्ये जनजागृती
Get real time updates directly on you device, subscribe now.