नाशिक : प्रतिनिधी
येथील महर्षि पतंजलि योगसंस्कार निकेतनच्या तीन विद्यार्थीनींनी युजीसी नेट परीक्षेत योगशास्त्र या विषयात यश मिळविले आहे. यातील एका विद्यार्थीनीने नेटसोबतच जेआरफ परीक्षेतही यश संपादन केले आहे.
रश्मी दुसाने, शालिनी म्हस्के व राधिका अंभोरे यांचा यात समावेश आहे. राधिका अंभोरे यांनी नेट परीक्षेसोबतच जेआरफ परीक्षेतही यश प्राप्त केले आहे.
प्रा. तुषार विसपुते व प्रा. चैतन्य कुलकर्णी
या विद्यार्थीनींना महर्षी पतंजली योगसंस्कार निकेतनचे योगाचार्य प्रा. राज सिन्नरकर, प्रा. तुषार विसपुते व प्रा. चैतन्य कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
हे महर्षी पतंजलींचे प्रेमपत्र आम्हास लाभले असून…सर्व पूजनीय प्राचीन भारतीय ऋषि आपल्या सर्वांच्या योगक्षेत्रातील कर्मयोगाची वाट पाहत आहेत…आता आपल्याला थांबून चालणार नाही…
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेतर्फे मनःपूर्वक अभिनंदन करुन… आपल्या योगगुरुंना व ऋषि मुनींना त्यांनी हे यश कृतज्ञतापूर्वक अर्पण केले आहे.
– योगाचार्य प्रा. राज सिन्नरकर