सप्तशृंगी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष काकड यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

0

नाशिक : प्रतिनिधी
दिंडोरी रोडवरील सप्तशृंगी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष काकड यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील आठवले-जोशी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक सुभाष काकड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतात.
शालेय साहित्य वाटपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वीज कंपनीचे नाशिक शहरी विभाग एकचे कार्यकारी अभियंता चेतन वाडे, ज्येष्ठ नगरसेवक अरुण पवार, माजी महापौर रंजना भानसी, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते, लोकमान्य शिक्षण संस्थेचे सचिव सुधीर पाटील, मुख्याध्यापक दर्शना मोरे, संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. राजाराम लोहकरे, संचालक एस. यू. पाटील, राहुल पवार, अविनाश दरगोडे, अजय मुळाणे आदी उपस्थित होते.

राहुल पवार यांनी संस्थापक अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करून त्यांच्या कार्याची प्रसंशा केली. मुख्याध्यापिका मोरे यांनी संस्था करीत असलेल्या सामजिक कामाचे कौतुक केले. उपाध्यक्ष लोहकरे यांनी संस्थेच्या एकजुटीमुळे संस्था प्रगती करीत असल्याचे सांगितले. कार्यकारी अभियंता वाडे यांनी संस्थेच्या कामाची प्रशंसा करून संस्थेला उज्वल भविष्य असल्याचे सांगितले. माजी महापौर भानसी व माजी गटनेते अरूण पवार यांनी संस्थापक सुभाष काकड यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची घोडदौड चालू असून संस्थेचे कार्य अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन केले. वीज कामगार नेते पंडितराव कुमावत यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थापक अध्यक्ष सुभाष काकड यांनी सर्वांचे वेळोवेळी मिळणारे सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेचे व्यवस्थापक अमोल सूर्यवंशी, अल्पबचत प्रतिनिधी मयूर लोखंडे आणि सचिन बनकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला एम. पी. दिघे, जयमाला काकड, पुनम आघाव, लक्ष्मी पवार, सविता म्हस्के, संगीता म्हस्के, आणि विद्यार्थी व शिक्षक, तसेच वीज कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.