नाशिक : प्रतिनिधी
रामटेक (नागपूर) येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातंर्गत येथील धम्मगिरी योग महाविद्यालयात विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमातंर्गत परीक्षा झाल्या. यात योग व निसर्गोपचार, तसेच आयुर्वेद अभ्यासक्रमांचा समावेश होता.
धम्मगिरी योग महाविद्यालय या केंद्रावर 15 मार्चपासून परीक्षेची सुरुवात झाली. या परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाबत समाधान व्यक्त केले. डिप्लोमा इन योगा, नॅचरोपॅथी ॲण्ड डायटीक्स, सर्टीफिकेट कोर्स योग ॲण्ड नॅचरोपॅथी, तसेच आयुर्वेद पंचकर्म प्रथम व द्वितीय वर्ष परीक्षा झाल्या. 27 मार्चला परीक्षा समाप्त झाल्या. धम्मगिरी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या सचिव डाॅ. पल्लवी जाधव, प्राचार्य यु. के. अहिरे व कर्मचारी वृंद परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते.
—