नाशिक : (पद्माकर पवार यांजकडून)
मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या गंगापूर रोडवरील मराठा हायस्कूलमध्ये लॉर्ड बेडन पॉवेल यांची जयंती चिंतन दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे होत्या. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक रमाकांत मोरे, पर्यवेक्षक प्रकाश पवार, शिवाजी शिंदे व रंजना घंगाळे उपस्थित होते.
व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी स्काऊट गाईड युनिफॉर्ममध्ये उपस्थित होते.
आजचा हा कार्यक्रम सकाळ सत्र व दुपार सत्र या दोन्ही सत्रात घेण्यात आला. सकाळच्या सत्रात संगीत शिक्षक दिनकर दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या गीतमंचाने स्काऊट गाईड प्रार्थना सादर केली. सकाळच्या सत्रात निकिता पवार या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. दुपारच्या सत्रात पुनम बच्छाव या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले.
मुख्याध्यापिका वारुंगसे म्हणाल्या की, स्काऊट गाईड चळवळीचे जनक बेडन पॉवेल यांचा जन्मदिन जगभरात चिंतन दिन म्हणून साजरा केला जातो. स्काऊट गाईड चळवळ जगभरात पोहोचविण्यासाठी, त्यांनी आपले पूर्ण आयुष्यपणाला लावले. सदैव तयार हे स्काऊट गाईडचे ध्येय त्यांनी सर्वप्रथम स्वतःसाठी अंगीकारून ते सदैव कार्यरत राहिले. त्याकरता शरीराने सुदृढ मन आणि जागृत व नीतीने पवित्र राहून आपण काम केले पाहिजे असे त्यांचे ध्येय होते. स्काऊट गाईड मुलांना या जगाचे आदर्श नागरिक बनवणे त्यांना स्वयंशिस्त लागावी हा मुख्यता या चळवळीचा हेतू आहे.गौरी खुटे व कल्याणी पाटील यांनी सूत्रसंचालन केले सिद्धी घुगे व सिद्धी आहिरे यांनी आभार मानले. या सर्व विद्यार्थ्यांना स्काऊट समितीचे प्रमुख सुनील बस्ते व गाईड समिती प्रमुख सुनिता गायकवाड, तसेच सुनंदा कदम, सविता साळुंखे,आशा उशीर यांचे मार्गदर्शन लाभले.
—
—