नाशिक : (राजेंद्र आढाव यांजकडून)
महावीर एज्युकेशन सोसायटीच्या महावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नाशिकच्यावतीने नुकतेच महाविद्यालयातील फार्मसी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूलकॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. मॅक्लिऑड्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीसाठी क्वालिटी असिस्टंट, क्वालिटी कंट्रोलर पदांसाठी, तसेच फॉर्म्युलेशन आणि प्रोडक्शन डिपार्टमेंटसाठीही विविध पोस्टसाठी कंपनीकडून भरती यावेळी करण्यात आली.
मॅक्लिओड्स फार्मास्युटिकल्स 1989 मध्ये स्थापित केली गेलेली असून जी संसर्गविरोधी, मधुमेहविरोधी, हृदय व रक्तवाहिन्यांसह अनेक प्रमुख उपचार क्षेत्रांमध्ये संशोधन विकास, उत्पादन आणि विपणन करते.
नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर,पुणे येथून विद्यार्थ्यांची उपस्थिती
डी. फार्मसी, बी. फार्मसी, एम. फार्मसी आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा पूर्ण केलेले एकूण १७४ विद्यार्थी मुलाखतीला उपस्थित होते. महावीर एज्युकेशन सोसायटीच्या महावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मधील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी देणे हा मुख्य उद्देश या पूल कॅम्पसचा होता अन्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही यावेळी संधी देण्यात आली. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर, पुणे येथून काही विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती.
४२ विद्यार्थ्यांना मिळाली नोकरी
या कॅम्पस मधून ४२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आणि त्यांना इंटर्नशिप ऑफरलेटर्सही देण्यात आले. निवड प्रक्रिया ३ फेऱ्यात पार पडली. सर्व प्रथम विद्यार्थ्यांची ऍप्टीट्यूड टेस्ट झाली. नंतर पात्र विद्यार्थ्यांची टेक्निकल इंटरव्हू झाली आणि शेवटी एच. आर. इंटरव्हू घेण्यात आली. मॅक्लिओड्स फार्मास्युटिकल्स लि. कडून प्रेसिडेंट एच. आर श्री. साईदत्ता नंदा, एच.आर.एक्झिक्युटिव्ह भव्या, एच.आर.देसाई, एच.आर.कॉर्पोरेट मिनाक्षी आदी उपस्थित होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिष संघवी, कार्यकारी विश्वस्थ राहुल संघवी, सोसायटी समन्वयक डॉ. प्रियंका झंवर, महावीर इन्स्टिटूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अनिल जाधव यांनी अभिनंदन केले.
उपक्रमासाठी प्रयत्नशील
कॅम्पस यशस्वीतेसाठी प्रा.अनघा सर्वज्ञ, वैशाली भामरे, शिवानी चव्हाण, उन्मेष भामरे, कुमुद अहिरराव, वंदना शिरसाठ, काजल खुर्दळ, श्रद्धा बोडके, आदित्य विसपुते, मनोज सोमवंशी आदी प्रयत्नशील होते.
—