प्रतिनिधी : नाशिक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा, विद्यापरिषद व अभ्यास मंडळावरील सभासदांसाठी निवडणुका नुकत्याच पार पडल्या व त्यांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये येथील अशोका एकात्मिक शिक्षणशास्र महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्रभारी प्राचार्या डॉ. आशा ठोके यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळ शिक्षणशास्त्र विभाग सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. सदर निवड ही पुढील पाच वर्षासाठी आहे.
अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांनी डॉ. आशा ठोके यांचा निवडीबद्दल सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील बीएच्या समन्वयक प्रा. स्मिता बोराडे व बीएस्सीच्या समन्वयक डॉ. रेखा पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी डॉ. ठोके यांचे अभिनंदन केले आहे.
—