नाशिक : (पद्माकर पवार)
मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या गंगापूर रोडवरील मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी टेनिकॉईट स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले. या सत्काराच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे होत्या. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक रमाकांत मोरे पर्यवेक्षक प्रकाश पवार, शिवाजी शिंदे, रंजना घंगाळे उपस्थित होते.
या विद्यार्थांचा सहभाग
यशवंत विद्यालय, नंदुरबार येथे शालेय विभागीय टेनिकॉईट स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलांच्या संघाने धुळे जिल्हा व नंदुरबार संघास पराभूत करून नंदुरबार येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची निवड झाली. या स्पर्धेमध्ये निखिल दिघे, सोहम पडोळ, ओंकार कसबे, सोपान कसबे, सिद्धेश माळोदे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला होता. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक संजय होळकर, सुहास खर्डे, बाळासाहेब रायते, हरिभाऊ डेर्ले, राजाराम पोटे, मंगला शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
यांनी केले अभिनंदन
त्यांच्या या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डाॅ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सरचिटणीस ॲड. नितीन (भाऊ) ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती डी. बी. मोगल, नाशिक शहर तालुका संचालक ॲड. लक्ष्मणराव लांडगे, नाशिक ग्रामीणचे तालुका संचालक रमेश पिंगळे व सर्व संचालक मंडळ, मविप्र समाज संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. डाॅ. भास्करराव ढोके, शिक्षणाधिकारी प्रा. डाॅ. अशोकराव पिंगळे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी चंद्रजित शिंदे, शालेय समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, पालक – शिक्षक संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य, मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे, उपमुख्याध्यापक रमाकांत मोरे, पर्यवेक्षक प्रकाश पवार, शिवाजी शिंदे, रंजना घंगाळे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
—
मराठा हायस्कूलचे टेनिकॉईट स्पर्धेत घवघवीत यश
Get real time updates directly on you device, subscribe now.
Next Post