नाशिक : (शिवनाथ हुजरे यांजकडून)
छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मखमलाबाद येथे शासनामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत इयत्ता आठवीची विद्यार्थिनी अनुष्का गीते हिने जिल्ह्यात सहावा क्रमांक मिळविला.
तसेच विद्यालयाचे एकूण 12 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. यामध्ये कुणाल कोतकर (64), कौस्तुभ नाठे (68), मोहित गोसावी (143), दामिनी सूर्यवंशी (160), अनुष्का बोरसे (207), तनुजा बहिरम (273) हे आठवीचे विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले. तसेच इयत्ता पाचवीचे गुणवत्ताधारक विद्यार्थी दिव्या रहाटळ (216), रोहन तुंगार (238), दीपक आढे ( 286), समीक्षा दिघे (313) आयुष मुसमाडे (338) याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
या विद्यार्थ्यांना ज्योती काळोगे, संगीता मापारी, कविता ठाकरे, सारिका पांगारकर, योगिता रोडे, वैशाली देवरे, मोनाली बेंडकुळे, कीर्ती जाधव, अर्चना दिघे, नीता खैरनार, सुनिता घोटेकर, चैताली पिंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले आहे. तसेच मविप्रचे संचालक रमेश पिंगळे, वाळू काकड, दिलीप पिंगळे, शंकरराव फडोळ यांच्या हस्ते विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य लालजी आवारे, उपप्राचार्य अण्णासाहेब ठाकरे, पर्यवेक्षिका माधुरी थेटे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
—