नाशिक : प्रतिनिधी
आयुर्वेद ही भारताची प्राचीन ऋषीमुनींनी संशोधित केलेली अतिशय प्रभावी चिकित्सा प्रणाली आहे. ती मनुष्याचे शरीर व मनावर संस्कार करते. परकीय राजवटीत या चिकित्सा प्रणालीला पध्दतशीरपणे तोडण्याचे प्रयत्न केले गेले. परंतु भारतीय आयुर्वेद पुन्हा पुन्हा पुनुरुज्जिवित झाला आणि वैभवाच्या शिखरावर आरूढ झाला. सध्याच्या युगात सारे विश्व या सामर्थ्यवान व दुष्परिणामरहित चिकित्सा प्रणालीकडे वेगाने आकर्षित होत आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे.
योग, आयुर्वेद व निसर्गोपचार यावर मनापासून प्रेम करणारे नाशिकचे महापौर सतिशनाना कुलकर्णी यांनी इंदिरानगर येथील श्री समर्थ आयुर्वेदला सदीच्छा भेट दिली व प्रेमपुर्वक शुभेच्छा दिल्या. या केंद्रात भारतातील सर्व नामांकित कंपन्यांचे सर्व आयुर्वेदीक औषधे उपलब्ध आहेत.
याप्रसंगी इंदिरानगर येथे महर्षी पतंजली योगसंस्कार निकेतन हे योगोपचार, निसर्गोपचार व आयुर्वेद पंचकर्म केंद्र चालवणारे प्रा. राज सिन्नरकर व प्रा. चैतन्य कुलकर्णी, डॉ. सचिन पाटील, प्रा.तुषार विसपुते हे उपस्थित होते. श्री समर्थ आयुर्वेदचे प्रफुल्ल मालपुरे व सुजाता मालपुरे यांनी आभार मानले.
—
इंदिरानगर येथील श्री समर्थ आयुर्वेदला महापौर सतिशनाना कुलकर्णी यांची सदीच्छा भेट
Get real time updates directly on you device, subscribe now.