नाशिक : प्रतिनिधी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांनी योग करावा. योगासने केल्याने अभ्यास करताना थकवा जाणवणार नाही. तसेच ओमकार व प्राणायाम केल्याने मन शांत राहील. त्यामुळे अभ्यास अधिक परिणामकारक होईल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. डाॅ. नागार्जुन वाडेकर यांनी केले.
अश्विननगरमधील धम्मगिरी योग महाविद्यालयात महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला. याप्रसंगी प्रा. डाॅ. वाडेकर बोलत होते. यावेळी धम्मगिरी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष कैलास जाधव, डाॅ. कमलेश खैरनार, मार्गदर्शक डाॅ. विशाल जाधव आदी उपस्थित होते. प्रा. डाॅ. वाडेकर यांनी, म. गांधी यांनी बॅरिस्टरचा अभ्यास कसा केला, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.