नाशिक : प्रतिनिधी
येथील स्त्री मंडळ यांच्या ८७ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (दि.24) सायंकाळी चार वाजता नृत्याविष्कार हा कार्यक्रम होणार आहे. चित्रपट संगीत आणि शास्त्रीय नृत्य प्रकारांचा मिलाप यात असेल. स्वरांजली संगीत संकुलनिर्मित हा कार्यक्रम आहे. याचे संयोजन सुवर्णा क्षीरसागर करत आहेत.

नृत्य सादरीकरण हे भरतनाट्यम नृत्यांगणा सोनाली करंदीकर यांच्या शिष्या व कथक नृत्यांगणा डॉ. सुमुखी अथणी यांच्या शिष्या करणार आहेत. स्त्री मंडळ हॉल, तिडके कॉलनी, पाण्याच्या टाकीशेजारी, त्रंबक रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी सर्वांना प्रवेश खुला असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.
—