प्रतिनिधी : नाशिक
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन संचालित नाशिक जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय योगासन निवड चाचणी स्पर्धा शनिवारी (दि.10) अरिहंत नर्सिंगहोम, प्रमोदनगर, गंगापूर रोड येथे होणार आहे.
स्पर्धा सकाळी आठ वाजेपासून सुरु होईल. ही स्पर्धा ट्रॅडिशनल योगासन, आर्टिस्टिक सिंगल, आर्टिस्टिक पेअर व रिदमिक पेअर या चार प्रकारात घेण्यात येणार आहे. मुले व मुली यांची वेगवेगळी तीन वयोगटात ही स्पर्धा होईल. सब जुनिअर गट (वय 9 ते 14), जुनिअर गट वय (14 ते 18) व सिनिअर गट वय 18 पेक्षाअधिक अशी स्पर्धा होईल.
या स्पर्धेतील पहिले तीन स्पर्धक हे राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी पात्र होऊन, त्यांना राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत पाठवले जाईल. विज्येत्या स्पर्धकांना पदके दिले जातील. सर्व सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येइल. अधिक माहितीसाठी आणि स्पर्धेत रजिस्ट्रेशन लिंकसाठी, नाशिक जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन उपाध्यक्ष व स्पर्धाप्रमुख दीपक उपासनी (मो: 9021670457), सेक्रेटरी प्रा. पीराजी नरवाडे (मो: 9422247209), कोषाध्यक्ष्य : मंदार भागवत (मो: 7720052527 यांच्याशी संपर्क साधावा. तसेच नाशिक जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात येत आहे.
—