नमस्कार
मी सौ.अर्चना शिशिर दीक्षित. भारतीय नौसेना अधिकारी कॅप्टन शिशिर दीक्षित यांची पत्नी आणि मिसेस इंडिया.
“अंदर कोई बाहर ना जा सके, बाहरसे कोई अंदर ना आ सके”, अशी सगळ्यांची परिस्थिती झाली होती.
सध्याची नाजूक परिस्थिती आपणा सर्वांनाच माहीत आहे. मध्यंतरीच्या लॉकडाउनमुळे आपण सर्व जण घरात बसून होतो. आनंदी राहण्यासाठी कोणी खाण्याचे पदार्थ करून पाहत होते, तर कोणी गाण्याचा अभ्यास, कोणी नृत्याचा रियाज, तर कोणी आपले कला गुण शोधत होते, तर कित्येकांचे म्हणणे होते की, आमचे घरी बसून नुसते वजन वाढत होते.
अहो, पण आपण घरी बसल्या बसल्या योगाभ्यास करू शकतो. योगासनाचे अनेक प्रकार आहेत. प्राणायाम, सूर्यनमस्कार, मधुमेहासाठी, संधिवातासाठी, गरोदर महिलांसाठी, दम्यासाठी, पाठीच्या मणक्याचे दुखणे, इतकेच काय पण वर्क फ्रॉम होम करणार्यांसाठी खुर्चीवर बसून देखील योगासने करता येतात.
योगाभ्यासामुळे आपल्या शरीरावर तसेच मनावर फारच सकारात्मक परिणाम होत असतो. ध्यान धारणेमुळे आणि प्राणायाम करण्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते.
आपणा सर्वांना माहीत आहे की योगाभ्यास हा आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा घटक बनला आहे. मी गेली अनेक वर्षे नियमित योगाभ्यास करत आहे. शिवाय मधल्या करोनाच्या काळात माझे स्वतःचे योगाचे युट्यूब चॅनेलदेखील सुरू केले होते.
मला “पुष्पावती चॅरिटेबल ट्रस्ट” निसर्गोपचाराच्या कोर्सबद्दल समजले. मी लगेच याविषयीची माहिती गोळा करायला सुरुवात केली. तेथील मान्यवरांनी मला योग्य मार्गदर्शन केले. मी रहायला मुंबई येथे असल्याचे त्यांना सांगितले. तर हा कोर्स आपण ऑनलाईन घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. योगाभ्यासाव्यतिरीक्त यात मड थेरपी, कपींग थेरपी, मसाज थेरपी, अॕक्युप्रेशर, योगा, अॕनॉटोमी इ. विषय असल्याचे समजले.
हा साधारण सहा महिन्याचा कोर्स आहे. याच्या प्रॅक्टिकलसाठी केंद्रात जाऊन योग्य मार्गदर्शनाखाली शिक्षा प्राप्त करु शकतो.
सर्वांच्या भेटीने सकारात्मकता वाढली
निसर्ग विद्यापिठामुळे नवीन कुटुंब जोडली
– सौ. अर्चना दीक्षित
—