सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : हार्निया  

0

हार्निया  

दोन स्नायू फाटणे त्यामुळे खड्डा किंवा पोकळी तयार होणे. आतडे उतरणे किंवा खोकल्यानंतर काखेत, जांघेत, अंडाशयात, पोटात फुगा येणे यालाच हार्निया म्हणतात.

लक्षणे
अंडकोश सुजणे, जांघेत सूज येणे, पोट फुलणे, फुगणे, पोटात फुगा येणे.

कारण

शरीराची कमजोरी, अति ताकद लावून एखादी वस्तू उचलणे, कुंथुन कुंथुन ताकद लावून गॅस किंवा शौच्यास करणे, यामुळे आंतरिक पेशी एकमेकांना चिकटतात. तेथे भार पडून बाहेरील स्नायू तुटणे, फाटणे, व खड्डा पडणे, फुगा येणे, असे घडते.

·       मलाचा दबाव आल्याने.
·       कठीण व्यायाम किंवा चुकीचा व्यायाम केल्याने.
·       खोकणे, शिंकणे, जोराने हसणे, मोठ्याने ओरडणे, जोराने धावणे, शौच्यास, उलटी जोर लावून करणे
·       पोटात अति गॅस होणे.
·       मलमूत्र आवेग रोकने.
·       शरीर अनावश्यक वाकविणे, वाकडे तिकडे करणे.
·       अति मद्यपान करणे.

योगोपचार

             आसन- विपरीत करणी, सर्वांगासन, शिर्षासन, नौकासन, अर्ध हलासन, झोपून वक्रासन करणे, शवासन.

प्राणायाम- नाडी शोधन,

निसर्गोपचार- उपवास चिकित्सा करावी. आहारात फक्त एकाच फळ ठेवावे. मठ्ठा, ताक, तरकारी भाज्या, कधी कधी दुध, प्रतिदिन थंड पाण्याच्या एकदा एनिमा घेणे, कटी स्नान, आठवड्यातून एकदा बाष्प स्नान व हलकी मसाज घ्यावी. 
(वरील चिकित्सा योग व निसर्गोपचार तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार घ्यावी.)

वर्ज- वजन उचलणे, अति कठीण व्यायाम, लघवी, शौच्या जोर लावू नये. इ .
– प्रा. डॉ. राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख,
संगमनेर महाविद्यालयसंगमनेर
ई-मेल : rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर : ९८२२४५०७६८

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.