म्हसरूळ, (वा.)
मखमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या 1991 व 1992 सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी तेव्हाच्या शिक्षकांसोबत एकत्र येऊन पुन्हा एकदा शाळा भरवली. यावेळी सर्वच जण भावनाप्रधान झाले होते.
निवृत्त सेवक दिगंबर पिंगळे यांनी घंटा वाजवून शाळेला सुरुवात झाली. आता हयात असलेले जवळपास सर्व शिक्षक उपस्थित होते.
फुलांच्या वर्षावात टाळ्यांच्या गजरात शिक्षकांचे वर्गात स्वागत करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दिवंगत विद्यार्थी व शिक्षकांना शांती मंत्र म्हणून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्व शिक्षकांचे स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी आपआपला परिचय करून दिला. कोणी अधिकारी, कोणी वकील, कोणी यशस्वी उद्योजक, तसेच नोकरी, उद्योग-व्यवसाय, शेती व राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे विद्यार्थी पाहिल्यानंतर शिक्षकांनाही आनंद झाला.
विद्यार्थ्यांचे मनोगत
संयोजक ज्ञानेश्वर काकड व कैलास दराडे यांनी स्वागत केले. तुषार गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले. विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. काही विद्यार्थी तसेच शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या शिक्षकांची उपस्थिती
शिक्षकांमध्ये एस. एम. पाटील, जी. बी. पाटील, भामरे, एस. बी. पवार, परदेशी, गांगुर्डे, शांताराम शेवाळे, ठाकरे, मेधने, कोठावळे, हांडगे, मुळाणे, उशीर, डी. एम. पाटील, पवार आदी उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष बस्ते, कैलास तिडके, सचिन फडोळ, मिलिंद महाले, सुनील बुणगे,भगवान काकड, निवृत्ती पिंगळे, मोहन पिंगळे, वर्षा फडोळ-घाडगे, मनीषा काकड-आव्हाड आदींसह अनेकांनी परिश्रम घेतले.