स्वामी श्री युक्तेश्वर गिरी यांची १० मे 2022ला असलेल्या जयंतीनिमित्त विशेष लेख…

0

स्वामी श्री युक्तेश्वर गिरी हे भारतातील एक उत्कृष्ट आध्यात्मिक शिक्षक आणि ‘योगी कथामृत’ या सुविख्यात, अभिजात आध्यात्मिक ग्रंथाचे लेखक श्री श्री परमहंस योगानंद यांचे गुरू होते. स्वामी श्री युक्तेश्वरजी मूळचे बंगालचे होते आणि त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव प्रियनाथ करार होते. त्यांचा जन्म 10 मे 1855 रोजी झाला, आणि त्यांनी निर्विवादपणे आध्यात्मिक उंचीचे शिखर गाठले होते. त्यांचे स्वतःचे परमगुरू, महावतार बाबाजी यांच्या आदेशानुसार त्यांनी लिहिलेले ’द होली सायन्स’ हे पुस्तक एक कालातीत अभिजात वाङ्मय आहे जे सर्व मानवजातीला आकलन होईल अशा रीतीने, खोल आध्यात्मिक सत्यांची थोडक्यात पण स्पष्ट रूपरेखा देते.

स्वामी श्री युक्तेश्वरजींनी त्यांचे प्रमुख शिष्य योगानंदजी यांना दिलेले प्रशिक्षण कठोर आणि काटेकोर असले, तरी सर्व बाबतीत परिपूर्ण होते. या प्रशिक्षणाद्वारे स्वामी श्री युक्तेश्वरजींनी योगानंदांना क्रिया योगाचे ज्ञान भारतातील आणि संपूर्ण जगातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, उत्तुंग आध्यात्मिक उंची गाठण्यास सक्षम केले. “क्रिया योग हे ते साधन आहे, ज्याद्वारे मानवी उत्क्रांती जलद होऊ शकते” असे श्री युक्तेश्वरजी म्हणाले. हे एक अचूक विज्ञान आहे, जे मानवजातीला शरीर, मन आणि आत्मा यांची शुद्धता प्राप्त करण्यासाठी आणि त्याचा निष्ठापूर्वक सराव करणाऱ्याला अखेरीस ईश्वराशी एकरूपता साधण्यास सक्षम करते.
स्वामी श्री युक्तेश्वरजींच्या आग्रहास्तव योगानंदजींनी पश्चिमेमध्ये क्रिया योगाचे प्रतिपादन केले. त्यांनी क्रिया योगाच्या ज्ञानाचा विश्वासार्हतेने प्रसार करण्यासाठी योगानंदांना सेल्फ-रिअलाइझेशन फेलोशिप आणि योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना करण्याचा सल्ला दिला होता. मानवजातीला योगाविषयी शिकवण्याच्या योगानंदजींच्या सुरूवातीच्या प्रयत्नांसाठी आणि अखेरीस ज्यांची आभा पृथ्वीच्या सर्व खंडांपलिकडे पसरलेली आहे, असे एक आध्यात्मिक दिग्गज म्हणून त्यांनी मिळवलेल्या भव्य यशासाठी, स्वामी श्री युक्तेश्वरजींचे मार्गदर्शन प्रामुख्याने जबाबदार होते.

स्वामी श्री युक्तेश्वरजी यांची त्यांचे प्रिय शिष्य योगानंदजींशी झालेली पहिली भेट नाट्यमय आणि प्रेरणादायी होती. त्यावेळी किशोरवयात असलेल्या योगानंदजीना बनारसच्या एका आडगल्लीत, आपण एका उंच, आकर्षक व्यक्तीकडे चुंबकीयरित्या ओढले जात आहोत, असे जाणवले. त्या संततुल्य व्यक्तीमध्ये त्यांना त्यांच्या अनेक जन्मांच्या गुरूंची ओळख पटली. ‘योगी कथामृत’ मध्ये उद्धृत केल्याप्रमाणे, त्या महान सद्गुरूंनी उच्चारलेले पहिले शब्द होते, “अरे, माझ्या जिवलगा, तू आला आहेस!” या शब्दांतून सर्व वाचकांसाठी गुरू-शिष्यांमधील चिरंतन नातेसंबंधातील ओढ चित्रित केली आहे.

महान गुरूंच्या दक्ष देखरेखीखाली व्यतीत केलेल्या त्यांच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये, योगानंदजींनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अशी जडणघडण केली, ज्यामुळे त्यांना ऐहिक आणि पारलौकिक महानता प्राप्त झाली. योगानंदजींना आध्यात्मिक उंचीच्या अंतिम शिखरावर नेण्यातच स्वामी श्री युक्तेश्वरजींच्या वारशाचे मोठेपण आहे.
मानवजातीद्वारे अनेकदा साधेपणाची शक्ती कमी लेखली जाते – प्रामुख्याने त्यांच्याकडून जे विविध क्षेत्रात खूप प्रयत्न करून  उत्कृष्ट यश मिळवतात – परंतु भारतातील संतांना साधेपणाचे गुण माहिती होते आणि त्यांच्या जीवनातून त्यांनी ते दाखवून दिले. स्वामी श्री युक्तेश्वरजींचे जीवन हे एक आदर्श जीवन होते. द होली सायन्स, हे त्यांचे पुस्तक म्हणजे एक पथदर्शक, महत्त्वपूर्ण प्रकाशन आहे, ज्याच्याकडे बघून पुढील युगातील मानवजात आश्‍चर्याने स्तिमित होऊन जाईल. तरीही, स्वामी श्री युक्तेश्वरजींच्या जीवनात आणि दिनचर्येत त्यांच्या शिष्यांच्या मुलभूत स्तरावरील, काटेकोर शिक्षणाला अधिक महत्व होते. त्यात महान, भव्य-दिव्य, विलक्षण अशा गोष्टींना स्थान नव्हते.
त्यांनी योगानंदजींना भारताच्या खोलवर रुजलेल्या महान शिकवणींचे नेतृत्व करण्यासाठी प्रशिक्षित केले, आणि योगानंदांनी या अतुलनीय सत्यांच्या वर वर दिसणाऱ्या गुंतागुंतीच्या मागे लपलेला साधेपणा अतिशय समर्थपणे पाश्चिमेतील आणि जगातील सर्वांसमोर प्रकट केला.
भारतातील एका महान आध्यात्मिक दूताचे मित्रतत्त्ववेत्ता आणि मार्गदर्शक बनूनस्वामी श्री युक्तेश्वर गिरी यांनी आध्यात्मिक पुनर्जागरणाचा मार्ग मोकळा केला. हे आध्यात्मिक पुनर्जागरण अजूनही जगभरातील सत्यशोधक स्त्री-पुरुषांच्या हृदयमन आणि आत्म्याला हळूहळू व्यापून टाकण्याच्या प्रक्रियेत आहे. अधिक माहिती: yssofindia.org

लेखक – विवेक त्रे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.