नाशिक : प्रतिनिधी
घरफोडीचा प्रकार रोकडोबावाडी येथे घडला. याबाबत उपनगर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी राहुल यादव दिनकर (रा. रोकडोबावाडी, देवळाली गाव, नाशिकरोड) यांच्या मानलेल्या मावशीच्या घरात 31 ऑक्टोबर रोजी कोणी तरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील लाल पेटी व त्यात असलेली 1 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम, 45 हजार रुपये किमतीचे 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, 20 हजार रुपये किमतीचा दहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा कोल्हापुरी हार, 20 हजार रुपये किमतीचा दहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार, 40 हजार रुपये किमतीचा 20 ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणीहार, 20 हजार रुपये किमतीचा 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा गहूहार, 10 हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे वेल, 10 हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुबे असा एकूण 3 लाख 15 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास लोंढे करीत आहेत.
—
रोकडोबावाडीत घरफोडी
Get real time updates directly on you device, subscribe now.
Prev Post
Next Post