नाशिक जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

0
म्हसरूळ : प्रतिनिधी
नाशिक जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुक पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व राष्ट्रपती पारितोषिक विजेते व्ही. के. धनाईत यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली. 2022 ते 2027 या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली आहे.
या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून महारु निकम, नितिन नानकर, अतुल आहिरे, विजय निकम, पंढरीनाथ नायकवाडे, अमोल झाडे, धनराज सगणे, कारभारी गावंडे, संभाजी पवार, भागवत चौधरी, पांडुरंग देवरे, तसेच महिला राखीव गटातुन सरला बच्छाव (बोरसे), संगिता पवार, अनुसुचित जाती-जमाती गटातुन भास्कर बागुल, इतर मागासवर्ग गटातुन कैलास निकम व विमुक्ती जाती-भटक्या जमाती गटातुन राजु दातीर यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या बिनविरोध निवडीबाबत महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभा राज्य कोषाध्यक्ष भास्कर भदाणे, जिल्हाध्यक्ष अंबादास आहिरे, जिल्हा सरचिटणीस संजय बोरसे, जिल्हा कार्याध्यक्ष मोतीराम सहारे व इतर सर्व सभासदांनी अभिनंदन केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.