नंदुरबार : प्रतिनिधी
नवापूर येथील जोशाबा सरकार युवा मंडळ व जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नंदुरबार यांच्या संयोजनाने येथील जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयात निसर्गोपचार शिबिर नुकतेच झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय शिंदे होते.
आंतरराष्ट्रीय नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन व सूर्या फाउंडेशन, नवी दिल्ली यांनी सुरू केलेल्या रोगमुक्त भारत अभियानाला संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान आयुष मंत्रालयातंर्गत आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमात योग व निसर्गोपचार या संदर्भात जनजागृती करण्यासाठी हे निसर्गोपचार शिबिर झाले.
प्राचार्य संजय शिंदे यांनी उत्तम आयोजन, तसेच कौन बनेगा स्वास्थ्यरक्षक या ऑनलाईन स्पर्धेचे कौतुक केले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे क्षेत्रीय संयोजक डॉ. नितीनकुमार माळी, योगशिक्षक एस. एन. पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत बिरादार, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष महामंडलेश्वर शिवानंद महाराज, राज्य संयोजक सुशांत पिसे, रमाकांत जाधव, ऑर्गनायझेशनच्या उत्तर महाराष्ट्राच्या संयुक्त सचिव व श्रीमती पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टतंर्गत अभिलाषा निसर्ग उपचार केंद्र व निसर्ग विद्या निकेतनच्या डॉ. तस्मीना शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
धर्मेंद्र भारती यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योगेश बागुल, भगतसिंग पाडवी, ज्येष्ठ शिक्षक नरेंद्र पाटील, संदीप बिराडे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील होते.
—