श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अपूर्व विज्ञान मेळावा उत्साहात

शिंदे (ता. जि. नाशिक) येथील उपक्रम

0

नाशिक : प्रतिनिधी
शिंदे (ता. जि. नाशिक) येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अपूर्व विज्ञान मेळावा झाला. यात बालशास्त्रज्ञांचे प्रयोग, रांगोळी, विज्ञान नाटिका, प्रश्नमंजुषा, चित्रकला अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एन. वाय. पगार होते. त्यांनी डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.  

टाकाऊपासून प्रयोग रचना                                                  यावेळी विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त प्रयोग रचना केली. यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, हवेचा दाब, ठिबक सिंचन, ज्वालामुखीचा उद्रेक, वीज, पाण्याची घनता, गोबर गॅस, न्यूटन डिस्क अशा विविध विषयांवर प्रतिकृती मांडल्या होत्या. वैज्ञानिक रांगोळीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रतिकृतींची रचना काढून आकर्षक रंग भरले. यामध्ये मानवी पचनसंस्था, श्वसनसंस्था, पाणी अडवा-पाणी जिरवा, माझी वसुंधरा, कोरोना महामारी, ताऱ्यांची सफर, भारताची अवकाश मोहीम, पेशीरचना, वृक्ष संवर्धन, प्रकाश संश्लेषण क्रिया आदी रचनांचा समावेश होता.
नाटिकांमधून विज्ञानाचे महत्त्व                                               इयता 6 वी व 8 वीच्या विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञान शाप की वरदान व प्लास्टिक प्रदूषण यावर नाटिकांमधून विज्ञानाचे महत्व पटवून दिले. वाळेकर व गावित यांनी विज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा तयार करून उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना जगभरातील शास्त्रज्ञांची नावे देऊन सन्मान करण्यात आला.
डाॅ. रमण यांच्याविषयी माहीती                                                देवरे यांनी, डॉ. सी. व्ही. रमण यांनी केलेले संशोधन, नोबेल पुरस्कार याबद्दल माहिती दिली. देसाई यांनी, विज्ञानाद्वारे अंधश्रद्धेवर कशा पद्धतीने  मात केली हे विविध उदाहरणांच्या माध्यमातून पटवून दिले. प्राचार्य पगार यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी अंधश्रद्धा, विज्ञानाची भरारी, अवकाश भरारी, मंगळ व चंद्र मोहीम, कोरोना महामारी, वाहतूक, दळणवळण अशा विविध क्षेत्रांमध्ये विज्ञानाचे योगदान सांगितले. फलक लेखन पटेल व जाट यांनी केले. विद्यार्थिनी धनश्री जाधव व तनुजा तुंगार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली .

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.