कर्ज मंजूर करून देतो म्हणत ऑनलाईन फसवणूक

0

नाशिक : प्रतिनिधी
पाच लाख रुपये कर्ज मंजूर करून देतो, असे आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने एका जणाला 33 हजार रुपयांचा ऑनलाईन फसवल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी निषाद भालचंद्र कुलकर्णी (वय 53, रा. श्रीरामकुंज सोसायटी, टाकळी रोड, द्वारका, नाशिक) यांना कर्ज काढायचे होते. त्यासाठी अज्ञात व्यक्तीने कुलकर्णी यांना ऑनलाईन लिंक पाठविली. यावर कर्जासाठी फॉर्म भरल्यानंतर अज्ञात इसमाने त्यांचा विश्वास संपादन केला, तसेच कुलकर्णी यांना पाच लाख रुपयांचे कर्ज झटपट मंजूर करून देतो, असे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला.
दरम्यान त्यानंतर अज्ञात इसमाने कुलकर्णी यांच्याकडून वेळोवेळी 33 हजार 49 रुपये जमा करण्यास सांगून ऑनलाईन फसवणूक केली. एवढे करुनही कर्ज मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुलकर्णी यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक ठाकूर करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.